अजितदादा मुख्यमंत्री होणार का? उत्तर देताना बच्चू कडूंचंही तळ्यात-मळ्यात

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? उत्तर देताना बच्चू कडूंचंही तळ्यात-मळ्यात

Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. त्यानंतर आता अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

यावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठं विधान केले आहे. पाच वर्षांचा कालखंड पाहिला तर अजितदादा मुख्यमंत्री होतील हे नाही म्हणू शकत नाही हो सुद्धा म्हणू शकत नाही. सध्याचं राजकारण अंदाजाच्या पलीकडचं राजकारण सध्या सुरू आहे. मी माझ्या राजकीय आयुष्यात इतक्या घडामोडी कधीच पाहिल्या नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा

काल झालेल्या खातेवाटपावरही त्यांनी भाष्य केले. खाती वाटपात मागून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले गेले आहे. जे राहिलेले आहेत त्यांच्या नशिबी काय येईल हे काही माहिती नाही. पण अजित पवार यांना जे दिलंय ते त्यांच्या मतानुसार आणि सोयीनुसारच दिल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकला आणि ते त्यात यशस्वी झाले.

आता समजलं मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला

न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असेच सुरुवातीला वाटत होते. पण, आता समजलं राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आता फक्त काँग्रेस पक्ष बाकी राहिला आहे. तो ही आला तर काय बिघडेल असा खोचक सवाल कडू यांनी केला.

तटकरेंना मंत्रिपद मिळालं, तुम्हाला कधी? गोगावलेंनी सांगितली पुढची तारीख….

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube