तटकरेंना मंत्रिपद मिळालं, तुम्हाला कधी? गोगावलेंनी सांगितली पुढची तारीख….

तटकरेंना मंत्रिपद मिळालं, तुम्हाला कधी? गोगावलेंनी सांगितली पुढची तारीख….

Bharat Gogavale : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expantion ) जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना खातेवापटंही झालं. भरत गोगावलेंच्या (Bharat Gogavale) प्रतिस्पर्धी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनाही मागून येऊन मंत्रिपद भेटले. मात्र, अद्याप गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही. दरम्यान, आता पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यावेळी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल, असं त्यांनी सांगितलं. (Bharat Gogavale On Cabinet ExpantionThe cabinet will be expanded after the session)

काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप झाले. पण, शिंदे गटातील आमदार मंत्रीपदासाठी वेट अॅंडच्या वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपल्याला मंत्रिपद कधी मिळणार? या प्रश्नावर बोलताना गोगावले यांनी सांगितलं, आता पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तेव्हा मला मंत्रिपद मिळेल. जेवढे शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपदे येतील, तेवढ्यांना मंत्रिपदे मिळतील, असं ते म्हणाले.

Tina Datta: ‘या’ लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची प्रकृती खालावली; अन् सोडली मालिका? 

अजित पवार गटाला अनेक महत्वाची आणि वजनदारी खाती मिळाली. यावरही गोगावलेंनी भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सांगितलं होतं की, तुम्ही जे कराल, जसं खातेवाटप कराल, त्याला आमचा पाठिंबा आहे. त्याप्रमाणे त्यांनी खातेवाटप केलं. राष्ट्रवादीला जी काही खाती मिळाली, ती चर्चा करून आणि विचार करून दिली आहेत. त्यामुळं खातेवाटपालाा एवढा वेळ लागला असल्याचं गोगावले म्हणाले.

अजित पवारांना अर्थ खातं मिळालं, आता तुमच्यावर पुन्हा निधी वाटपावरून अन्याय होईल, असं विचारताच गोगावले म्हणाले, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत निधी वाटपाबाबत जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथं होणार नाही. त्यामुळं अन्याय व्हायचा प्रश्नच नाही. कारण, आता फडणवीसही मंत्रिमंडळात आहेत.

दरम्यान, पहिल्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळं शिंदे गटातील अनेक आमदार आस लावून बसले आहेत. त्यामुळं रखडेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, आणि त्यात कोणा कोणाला संधी मिळणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube