Vitthal Rukmini Temple : विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती, नाणी अन् बरंच काही…

Vitthal Rukmini Temple : विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती, नाणी अन् बरंच काही…

Vitthal Rukmini Temple : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukmini Temple) तळघर सापड्याचं समोर आलं आहे. या मंदिराच्या तळघरात पुरातन मुर्ती आढळून आल्या आहेत. मंदिराच्या जीर्णाद्धाराचं काम शासनाच्या निधीतून सुरु असून हे काम सुरु असतानाच पुरातन वस्तू, प्राचीन मूर्ती, जुनी नाणी आणि बांगड्यांचे अवशेष आढळून आले आहेत.

गाऊनपासून साड्यांपर्यंत अंकिता लोखंडेचे कमालीचे लूक्स, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हे तळघर आढळून आले आहे. ते 7 ते 8 फुटांचे असल्याचं दिसून आले आहे. या तळघरातून तीन दगडांच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मंदिराचं काम सुरु आहे. तळघराखाली 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती साचली असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Mr and Mrs Mahi: ‘असा चित्रपट पहायलाच हवा’; राजकुमारच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’चं तोंडभरून कौतुक

मंदिरातील तळघरात 3 मोठ्या दगडी मूर्ती, 2 छोट्या मूर्ती आणि 1 पादुका सापडल्या आहेत.तसेच मातीत काचेच्या बांगड्या जुनी नाणीही आढळून आल्या आहेत. तळघराचं बांधकाम चुन्याचं प्लास्टर असून आणखीन दगडी मूर्ती असल्याचं दिसून येत आहे. या मुर्ती 12-13 व्या शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं. विशेष म्हणजे यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती असून इतर मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत.

माजी महापौरांवरील गोळीबार राजकीय षडयंत्र, 4 जूननंतर विरोधकांना बंदूकीच्या धाकावर…; जलील यांचा आरोप

दरम्यान, या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागाकडून सुरु आहे. यामध्ये बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप या ठिकाणांचं काम सुरु आहे. तर 15 मार्चपासून गाभाऱ्यामध्ये जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरु असल्याने विठुरायाचे चरणस्पर्श करता येत नव्हतं. येत्या 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या