प्रफुल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली का? वाऱ्यासारख्या वृत्ताला अखेर पूर्णविराम

प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती.

  • Written By: Published:

Praful Patel reaction on NCP president appointment : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता खुद्द पटेल यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून, माझी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त साफ खोट असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गोयल यांनी हा खुलासा केला होता. त्यावर आता पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समोर आलेलं वृत्त निराधार अन् खोटं 

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये पटेल यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचे निदर्शात आले आहे.  मात्र, प्रसारित होणारं हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, यात कोणतेही तथ्य नाही.

अध्यक्षपदाचा निर्णय कुणी एकटा घेऊ शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेस हा एक लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. अध्यक्षपदासारख्या मोठ्या पदाचा निर्णय कोणीही एकटा घेऊ शकत नाही. त्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची आहे. पक्षातील मोठे नेते आणि निवडून आलेल्या आमदारांशी, पक्षाचे काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. अध्यक्षपदाची निवड करताना पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनाही लक्षात घेतल्या जातात, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष आहे, आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्वीपासून चालत आलेल्या प्रक्रियेनुसारच होते, असे पटेल यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काल (दि.31) राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर लोकभवन येथे त्यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. ज्यात क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

follow us