‘ती’ मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही; हे जरांगेंना सांगण्याची हिम्मत मराठा पुढाऱ्यांनी दाखवावी, आंबेडकरांचे थेट चॅलेंज

Prakash Ambedkar: मराठा आरक्षणाच्या माध्यमातून डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Adv Balasheb Ambedkar

Prakash Ambedkar On Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केलंय. उपोषणाच्या तीन दिवसानंतरही सरकारचे शिष्टमंडळ आंदोलकांकडे फिरकले नाही. या आंदोलनात जरांगे यांनी जात पडताळणी समिती रद्द करण्याची नवी मागणी केलीय. त्यामुळे मागणीवर जरांगे यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जरांगे यांची मागणी मान्य होणार नसल्याचे सांगत मराठा पुढाऱ्यांनी एक चॅलेंज दिले आहे.

फडणवीसांनी पुण्यातील डीजेचा प्रश्न टाळला की हुशारीने बाजू बदलली? बॅकफुट की डॅमेज कंट्रोल?

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. नाहीतर मागच्या वेळेस जे यादवी होणार होती, ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये. ती वंचित बहुजन आघाडीने मिळून ती मिटविले होती. हाताच्या बाहेर जाऊ दिले नाही आताही तशीच परिस्थिती उद्भवत असल्याचे मला दिसतेय, असा धोका प्रकाश आंबेडकर यांनी दा
दाखवून दिला आहे.


Eng vs Pak : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार अन् मुख्य प्रशिक्षकही बदलणार

मनोज जरांगे यांना भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे पाठिंबा देतायत, त्यांनी सांगितले पाहिजे की, जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही. एवढी सांगण्याची हिम्मत महाराष्ट्रात, देशावर राज्य करणाऱ्या पुढाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन मी करतोय. जरांगे यांना मागणी मान्य होणार न मान्य हे सांगणार कोण ? तेथील त्याच समाजातील माणसे सांगतील. आम्ही किती सांगितले तरी हे मान्य होणार नाही. ते एेकणार नाही. जे आमदार, खासदार, नेते त्यांना भेटालला गेले आहे. त्यांनी सांगावे ही मागणी कधीच मान्य होणार नाही, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

follow us