उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजपला डाव टाकला; पंढरपुरमध्ये भालकेंचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे

News Photo   2026 04 12T174915.695

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Shivsena) पंढरपुरच्या नगराध्यक्षा प्राणिता भालके यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे. पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे स्वागत करत शिवसेना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

Lok Sabha Election: माढ्यात शेवटच्या क्षणी ट्वीस्ट; धैर्यशील मोहितेंना भालके गटाचा पाठिंबा

पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके भगीरथ भालके अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकारी पंढरपूर मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. पंढरपूर विधानसभेची जागा ही भाजपकडे असून येथून आमदार समाधान आवताडे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. दोन्ही निवडणुकीत अवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. याही वेळी भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. यानंतर झालेल्या पंचायतराज निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी मनसे एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा सर्व पक्षांना एकत्रित करत भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी स्थापन केली होती.

अनिल सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून त्यांनीही विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढविली होती. भाजप विरोधात लढवलेले हे दोन्ही उमेदवार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखलं झाले आहेत. आता भाजपच्या अडचणी वाढू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या पंढरपूर नगरपालिकेत भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असल्या तरी पंढरपूर नगरपालिकेत भाजपच वर्चस्व आहे. तसंच, शिंदे पंढरपूरमध्ये विकास काम करती असा दावाही त्यांनी केला.

follow us