2 हजाराच्या नोटा बंद करणं सरकारचा बालिश निर्णय; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Prithviraj Chavan on Rbi decision : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या 2000 च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर आता अनेक प्रतिक्रिया येत असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नोटाबंदीच्या आधीच्या निर्णयाप्रमाणेच २ हजाराच्या नोटा बंद करणं हा निर्णयही बालिश आहे.
https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0
चव्हाण यांनी सांगितले की, मोदींना कुठल्यातरी वैदू अर्थशास्ज्ञज्ञानाचा सल्ला घेऊन नोटबंदीचा निर्णय घेतला होता. नोटबंदीमुळे पाकिस्तानमधला आंतकवाद थांबेल, भ्रष्टाचार थांबेल असं वाटल्यानं त्यांनी नोटबंदीचा बालिश निर्णय घेतला होता. या नोटबंदीच्या निर्णयामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला होता. या नोटबंदीचा अनेकांना त्रास झाला होता. नोटा बदलण्यासाठी सामान्य माणसाला रांगेत उभं राहावं लागलं होतं. नोटा बदलण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात लोक मरण पावले. या नोटबंदीची जी उद्दीष्टे सरकारने सांगितली होती. ती काही साध्य झाली नाही, असं चव्हाण म्हणाले.
Karnataka Government : सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये कोण मंत्री होणार? हे पाच घटक ठरवतील
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, सरकारच्या एका निर्णयामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रास सहन करावा लागला असे माझ्यासमोर दुसरे उदाहरण नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारतातील किमान १२० कोटी लोकांना नोटाबंदीचा फटका बसला आहे.
आता एका बाजूने कर्नाटकचा दारून पराभव झालेला आहे. मतदारांनी कर्नाटकमध्ये भाजपला नाकारले आहे. त्या आता आपण काहीतरी हालचाल करतो, हे दाखवण्यासाठी आज ही घोषणा सरकारने केली आहे.
चव्हाण म्हणाले की, सरकारने १ हजारांची नोटबंद केली. जगात असा एकही देश नाही की, जिथं १००,१ हजारांची नोट नाही. आणि आपण १ हजाराची नोट बंद केली. ही चुक झाल्यानं अन्य देश आपल्या केंद्रीय बॅंकेवर हसतात. त्यामुळं आरबीआयने मोदींवर दबाव आणून २००० ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला असावा, आणि आता आरबीआय १ हजाराच्या नोटा चलनात आणण्याचा विचारात आहे, असं दिसतं. मात्र, यातून काही साध्य होणार नाही. फक्त जनतेला त्रास होणार आहे. कर्नाटकच्या निडणुकीच्या पराभववारून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी २ हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.