विविध मागण्यांसाठी साई संस्थान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी साई संस्थान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

अहमदनगर : साईबाबा संस्थानच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. हे आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले.

या आंदोलनात महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईबाबा संस्थान प्रशासनाला विद्यार्थ्यांनी यापुर्वीही निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विविध विषयांसाठी फक्त चार शिक्षक असल्याने शिक्षकांची संख्या वाढवावी, वाचनालयात पुरेसे पुस्तके उपलब्ध नाहीत, वर्षभरात कम्प्युटरच्या विषयांचे अवघे चारच प्रॅक्टिकल होतात, कॅन्टीनमध्ये पुरेसे खाण्याचे पदार्थ मिळत नाही, योग्य मैदान व सर्व क्रीडा साहित्य उपलब्ध नाही आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत आपल्या मागण्या मांडल्या. सुमारे दोन ते अडीच तास हे आंदोलन चालले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत प्रशासकीय अधिकारी उगले यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube