पुण्यातील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ IT कंपनी रातोरात बंद; 700 हून अधिक इंजिनियर बेरोजगार
Think Technology Company : पुण्यातील हिंजवडी येथे असणारी आयटी कंपनी थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी अचानक रातोरात बंद झाल्याने 700
Think Technology Company : पुण्यातील हिंजवडी येथे असणारी आयटी कंपनी थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी अचानक रातोरात बंद झाल्याने 700 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स (Think Technology Company) बेरोजगार झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंजवडी (Hinjewadi) फेज-2 येथे असणारी थिंक टेक्नॉलॉजी कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता रातोरात कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे पगार देत नव्हती. तर दुसरीकडे पगार म्हणून कंपनीने काही कर्मचाऱ्यांना चेक दिले होते मात्र ते चेक देखील बँकेत बाऊन्स (Bounced Checks) झाले. तर कंपनीने रातोरात कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे 700 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स बेरोजगार झाले आहेत.
लाडक्या बहिणींना धक्का; तब्बल 80 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 1500 रुपये
तर दुसरीकडे नोकरीवर रुजू करुन घेताना कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव घेतली होती मात्र ही रक्कम देखील परत न करता कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
अहिल्यादेवींच्या कार्यक्रमात झिंगाट गाणे…रोहित पवारांनी शिंदेंचे शाब्दिक कान टोचले-