सरकारच्या कामाची पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला ‘बक्षीस’; दाखवला घरचा रस्ता

Reshma Pardhi : अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणारा पोषण आहारा चांगल्या दर्जाचा नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याऱ्या

Reshma Pardhi

Reshma Pardhi : अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणारा पोषण आहारा चांगल्या दर्जाचा नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधीवर पुणे जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयीन शिस्त सोडून वागल्यामुळे तसेच वरिष्ठांच्या आदेशचाा अवमान केल्यामुळे त्यांना अंगणवाडी सेविका पदावरुन कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या या सुपरफास्ट कारवाईनंतर विरोधक देखील आक्रमक झाले असून जिल्हा परिषदेने कारवाई मागे घेण्याची मागणी करत आहे.

रेश्मा पारधी पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील नंबरवाडी या अंगणवाडीमध्ये कार्यरत (Anganwadi Worker) होत्या. त्यांनी या अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणारा पोषण आहार चांगल्या दर्जाचा नसल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आहारातील वाटाणा कूकरच्या 10-12 शिट्ट्या झाल्यानंतरही शिजत नाही त्यामुळे नाईलाजास्तव तसाच आहार मुला- मुलींना खायला द्यावा लागतो असा दावा त्यांनी या व्हिडिओत केला होता. तर आता पुणे जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेकडून (Pune Zilla Parishad) 14 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या आदेशात कार्यालयीन शिस्त सोडून वागल्यामुळे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या कारवाईनंतर रेश्मा पारधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरले. जी माझ्या मुलांबद्दल काळजी वाटली ती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली. आज जर अंगणवाडीतील मुलांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरतात. आयसीडीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही.

महाराष्ट्राने गुजरातच्या दारात भीक मागायची का? संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल –

माझं चुकलं असेल तर जरुर नोटीस काढा. आज मी माझ्या मुलांच्या आहारावर प्रश्न मांडते आहे आणि आज मला कामावरुन कमी करण्याचं नोटीस काढताय. तर दुसरीकडे अंगणवाडी कर्मचारी संघटनाने देखील याची दखल घेत सरकारकडे कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! – रोहित पवार 

तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना आमदार रोहित पवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की,  अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला. चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का? तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील दहा दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

follow us