निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं… ठाकरेंचा भाजपवर पलटवार

निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं… ठाकरेंचा भाजपवर पलटवार

Raj Thackeray Slam Ashish Shelar Over Criticism : भाजपाला धोबीपछाड देत कर्नाटकात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांच्या विजयाचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक करत भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलारांकडून उत्तर देण्यात आले. आता पुन्हा एकदा शेलारांच्या टीकेला राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. निवडणूका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं असून त्यांचे अस्तित्व नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे.

दह्याच्या मदतीने डार्क सर्कलची समस्या होईल दूर…

शेलार नेमकं काय म्हटले होते?
घरात बसून स्वप्न पाहिल्यावर स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो असा शाब्दिक टोला शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. जालंधरमध्ये आप का जिंकली आणि काँग्रेसचा पराभव का झाला, त्या ठिकाणी ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम नाही झाला का? उत्तर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. तिथेही भारत जोडो यात्रा चालली नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच ते अस्तित्व टिकवण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत, असे शेलार यांनी म्हटले.

Karnataka Government Formation : काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली; मुख्यमंत्रिपदाचा चेंडू कॉंग्रेस अध्यक्षांच्या न्यायालयात

शेलारांच्या टीकेला राज यांचा पलटवार
कितीही मोठा विरोधी असला तरीदेखील विरोधकांच्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणाम कर्नाटक निवडणुकीत दिसून आला हे सत्य आहे हे त्यांना मान्यच करावं लागेल. या पराभवातून बोध घ्यावा लागेल. जर त्यातून बोध घ्यायचा नसेल तर त्यांनी आपलं सुरूच ठेवावं असं त्यांनी म्हटले. तसेच राज ठाकरे म्हणाले की, “यांचं अस्तित्व मोदींमुळे टिकून आहे. त्याशिवाय यांना खाली कोण ओळखतं? मी यांच्या बोलण्याच्या फार काही वाटेला जात नाही. छोटी माणसं आहेत.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube