राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

दरम्यान मार्डने काही दिवसांपूर्वीच आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता मार्डचे डॉक्टर संपावर जाणार आहेत.

मार्डच्या संपात राज्यातील डॉक्टर सहभागी होणार असल्याने अनेक जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. निवासी डॉक्टरांच्या संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला आहे.

जाणून घ्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या
मार्डने वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करावी
वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरुस्त करावे
निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची होणारी हेळसांड थांबवावी
सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरावी
महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ लागू करा
सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube