“भीमनवारांचा राजीनामा घ्या; तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा”, रोहित पवारांची मागणी!
Rohit Pawar Demand MPSC ज्या नियम व अटी आहेत. त्यानुसार तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद द्यावं.
Rohit Pawar Demand MPSC New Chairman Tukaram Mundhe: एमपीएससी (MPSC) पेपरफुटीमुळे राज्यातील MPSC चे विद्यार्थी संतापले आहेत. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. “MPSC पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी राजीनामा देण्यास तयार आहे”, असे विवेक भीमनवार म्हणाले. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. पण रोहीत पवारांनी यावेळी केलेल्या आणखी एका मागणीची चर्चा होत आहे. ती मागणी होती तुकाराम मुंढे यांना MPSC चा अध्यक्ष करण्याची.
‘लग्नासाठी सरकारने मदत करावी’; सोलापुरात तरुणाचा ठिय्या, 1 लाखांच्या अनुदानाची मागणी
पत्रकार परिषेदेत रोहित पवारांनी महापरिवहन विभागात विवेक भीमनवार कार्यरत असताना झालेल्या घोटाळ्याची, तक्रारीची आणि गैरव्यवहाराची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, भीमनवार यांचा राजीनामा जर घेतला नाही तर ते मुख्यमंत्र्यांचे खास मित्र आहेत, असा संदेश लोकांमध्ये जाईल, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
मंत्री अतुल सावेंच्या भावाला-पुतण्याला जबर मारहाण; शेतीच्या बांधावरून पेटला होता वाद!
शिवाय भाजप आमदार विक्रम पाचपुते हे पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावरुन रोहित पवार यांनी पाचपुतेंना टोला लगावला. भाजपकडून कोणीतरी आलं होतं तुमच्याशी बोलायला, त्यांची फजिती झाली, असे रोहित पवार म्हणाले. आम्ही लढत राहणार, तुम्ही पाठींबा द्या. कारण हा विषय महत्वाचा आहे. विवेक भीमनवार यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. सत्ताधारी आमदारांनीही यावं आणि विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसावं, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच तुकाराम मुंढे यांना MPSC चा अध्यक्ष करावं, अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्षपदावर बसू शकतात. मी सगळं चेक केलं आहे. ज्या नियम व अटी आहेत. त्यानुसार तुकाराम मुंढे हे MPSCआयोगाच्या अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे मुंढेंना MPSCआयोगाच्या अध्यक्षपद देण्यात यावं, अशी मागणी रोहित पवारांनी यावेळी केली. ज्याची आता चर्चा होत आहे.