Maharashtra Politics : ‘संभाजीनगर लोकसभा जागा शिंदे गटाचीच, संदीपान भुमरेंचा दावा

Maharashtra Politics : ‘संभाजीनगर लोकसभा जागा शिंदे गटाचीच, संदीपान भुमरेंचा दावा

पंढरपूर : विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमच्यात कोणीही नाराज नसल्याचा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केला. विधानपरिषद निवडणूक (Maharashtra Cabinet Expansion) निकालाचा कोणताही फटका आम्हाला बसला नसून आमची ताकद काय हे 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येऊन आम्ही दाखवून देणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी सांगितले.

संभाजीनगर (Sambhajinagar) येथील लोकसभेची जागा ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची (Shiv Sena) असून येथे कोणीही दावा केला तरी ही जागा शिंदे गट (Shinde group) लढवणार आणि जिंकणार असे भुमरे यांनी सांगितले. पक्षाने आदेश दिला तर संभाजीनगर लोकसभा लढवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी मागील महिन्यातच औरंगाबादचे खासदार कोण होणार यावरुन इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळला होता..
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होईल, असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे.

त्यास प्रत्युत्तर देत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीतही दोघांच्या भांडणाचा फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे रिंगणात कितीही आणि कोणीही उमेदवार येऊ द्या, पुढचा खासदार हा मीच असणार, असा प्रतिदावाच त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube