‘इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करुन एकमताने मार्ग काढा’; संभाजीराजेंनी वाघनखाच्या मुद्द्यावर सोडलं मौन

‘इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करुन एकमताने मार्ग काढा’; संभाजीराजेंनी वाघनखाच्या मुद्द्यावर सोडलं मौन

Sambhajiraje Chatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखं येत्या 16 नोव्हेंबरला भारतात दाखल होणार आहेत. या वाघनखांवरुन राज्यात राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. ही वाघनखं अफजलखानाच्या वधावेळीच वापरल्याचा दावा सरकारने केलायं तर इतिहासकारांनी ही ती वाघनखं नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje Chatrapati) यांनी सरकारला सल्ला दिला आहे. इतिसहास तज्ञांशी चर्चा करुन एकमताने मार्ग काढा, असा सल्लाच संभाजीराजेंनी दिला आहे. यासंदर्भातील पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर शेअर केली आहे.

शाकाहारी टेबलावर मांसाहार; IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

संभाजीराजे पोस्टमध्ये म्हणतात, “लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. २०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी “शक्यता” असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या ताब्यात आहेत. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे. ही वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत. सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय 3 वर्षासाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झालं आहे.

Kangana Ranaut: बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर पाहिलात का?

आता ही वाघनखं भारतात येणार आहेत. मात्र, तीन वर्षांच्या करारानूसार लंडनने ही वाघनखं दिली आहेत. तीन वर्षानंतर वाघनखं पुन्हा लंडनला जाणार असल्याने हे वेदनादायी असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट दिलेली वाघनखांस ऐतिहासिक मूल्य असून हे कुणीच नाकारु शकत नाहीत. आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघनखं भारतात दाखल झाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयांमध्ये ही मौल्यवान शस्त्रं सामान्य नगरिकांना पाहण्यासाठी ठेवली जातील, असं सरकारने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube