Kolhapur Band : संभाजीराजे म्हणाले, दोषींवर इतकी कडक कारवाई करा, की…

Kolhapur Band : संभाजीराजे म्हणाले, दोषींवर इतकी कडक कारवाई करा, की…

Kolhapur Band : दोषींवर इतकी कठोर कारवाई करा की पुन्हा औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचं धाडस नाही झालं पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलीय. दरम्यान, शिवराज्याभिषेकदिनीच औरंगजेबाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आलीय, या बंदला हिंसक वळण लागल्याचा प्रकार घडला. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.(Sambhajiraje Chatrapati speak on kolhapur bandh)

संभाजीराजे ट्विटमध्ये म्हणाले, शिवशाहुंच्या कोल्हापुर नगरीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करुन इतकी कठोर कारवाई करावी,की पुन्हा औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचं व सामाजिक सलोखा बिघडवण्याचं धाडस कुणाचंच झालं नाही पाहिजे, असं संभाजीराजे म्हटलं आहेत.

Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

काल कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्ट स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला. औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्टबद्दल समजताच काही हिंदुत्ववादी तरुणांनी हातात भगवे झेंडे घेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत लक्ष्मीपुरा पोलिस ठाण्यासमोर एकच गर्दी केली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आली होती.

भुजबळांनी सांगितला अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला; म्हणाले प्रत्येक…

त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. शहरातील बिंदू चौकासह अंबाबाई मंदिर, महाद्वार मार्ग परिसरात असंख्य तरुण रस्त्यावर उतरले होते.

Ashes 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

या मोर्चादरम्यान, जमावाकडून अचानक अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आहे. पोलिसांकडून लाठीचार्ज केला तरीही परिस्थिती आटोक्यात न आल्याने पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या प्रकारानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत असून अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube