Sanjay Raut : ….म्हणे आमच्यावर दगड मारणार, दगड मारायला छातीत हिम्मत लागते, ते गद्दारांच काम नव्हे
Sanjay Raut On Gulabrao Patil : जळगाव म्हणजे सुवर्णनगरी आहे, परंतु येथे काही दगड निघाले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार, दगड मारायला छातीत हिम्मत लागते ते गदारांचं काम नव्हे, म्हणे घुसून दाखवा अजून किती घुसायचं असं म्हणत संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. ते आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभेत बोलत होते.
आजच्या सभेने निकाल स्पष्ट दिला आहे, पाचोरा हे कडवट शिवसैनिकांचं, उद्धव ठाकरेंवर निष्ठा ठेवणाऱ्या शिवसैनिकांचं, आरो तात्या पाटील नंतर पाचोरा हे वैशालीताईंचं आहे. हे पाचोरा कोणाच्या बापाचं नव्हे असं म्हणत संजय राऊत यांनी पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचावर निशाणा साधला.
शिवसेनेच्या नादाला लागू नका, ही बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांची शिवसेना आहे, या जळगावात गुलाबो गॅंग स्थापन झाली. त्यांनी 200 कोटी घेतले असे म्हणत राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. या खोके वाल्या 50 – 50 चा बंदोबस्त आपण करणार आहोत. फक्त यासाठी उद्धव ठाकरेंना तुमच्या सारख्या शिवसैनिकांची गरज आहे. असे यावेळी राऊत म्हणाले.
पालकमंत्री बालक मंत्र्यासारखे वागतात; सुषमा अंधारेंनी घेतला गुलाबराव पाटील, राज ठाकरेंचा समाचार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यानी फार घोटाळा केलेला आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसोबतचा वाद ओढून घेतला आहे. तो घोटाळा या पाचोऱ्यात देखील झालेला आहे. त्याला देखील आपल्याला दुरुस्त करायचं आहे. म्हणून ही सभा घेतली या जळगाव मधील प्रत्येक विधानसभेवर आणि लोकसभेवर आपल्याच शिवसेनेचा भगवा फडकायचा आहे. असा इशारा संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना दिला आहे.