Sanjay Raut : नगरसेवक, आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठीही ठरला रेट; राऊतांनी आकडाच सांगितला

Sanjay Raut : नगरसेवक, आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठीही ठरला रेट; राऊतांनी आकडाच सांगितला

Sanjay Raut News : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर राऊत यांनी नगरसेवक, आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी किती पैसे मोजले जात आहेत याचाही आकडा जाहीर करून टाकला आहे. राऊत म्हणाले, की ‘माझ्याकडे पक्की माहिती आहे की नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये दर ठरला. आमदारासाठी 50 कोटी आणि खासदारासाठी 100 कोटी रुपये देत आहेत.’

हे वाचा : Sanjay Raut : शिवसेना नावासह धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटींचा सौदा

‘या लोकांनी शिवेसना नाव आणि चिन्ह विकत घेतले. यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डर यांनी ही रक्कम दिली आहे. त्यांनी आता नाव आणि चिन्ह विकत घेतलं. आता हे मुंबई आणि महाराष्ट्र (Maharashtra) देखील विकत घेतील’, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.  ‘आज हजारो काश्मिरी पंडित जम्मूला येऊन का थांबले आहेत ? आजही ते घरी जायला तयार नाहीत. त्यांना तुम्ही संरक्षण देऊ शकला नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांना जर हे माहिती नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. हिंडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. 2014 पासून ईव्हीएमही हॅक करण्यात आले आहे. एक इस्त्रायली कंपनीला यांनी काँट्रॅक्ट दिले आहे. यांनी हिंडेनबर्ग रिपोर्टवर देखील उत्तर दिले नाही,’ अशा शब्दांत राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला चिमटा काढला.

https://www.youtube.com/watch?v=u5qJ3xg_42o

ते पुढे म्हणाले, की ‘माझ्याकडे पक्की माहिती आहे नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला आहे. आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रूपये देत आहेत. यांनी नावं आणि चिन्ह विकत घेतलं आहे. यासाठी 2 हजार कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या मिञ परिवारातील बिल्डर यांनी ही रक्कम दिली आहे,’ असा आरोप राऊत यांनी केला. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हते असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube