पुणे लोकसभेच्या वादात ठाकरे गटाची उडी; राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे टोचले कान
Sanjay Raut On Pune Loksabha ByPoll : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन सूचक विधान केले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
कसेल त्याचीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल!, असे त्यांनी म्हटले आहे.
Letsupp Special : आमदार-मंत्र्यांचे PA ते राज्याचे नेते; पडद्यामागून येत Politics गाजवणारे चेहरे
दरम्यान, पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते आहे. पुण्याची लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेस लढवते. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसते आहे. याआधी जयंत पाटील यांनी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी पुणे लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसकडून मागू असं म्हटलं होतं.
https://t.co/unXxef5J6M
कसेल त्याचीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर "कसबा" प्रमाणे पुणे "लोकसभा" पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान…— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2023
त्यानंतर अजित पवार यांनीही ज्याची ताकद जास्त त्यांनी जागा लढवावी असं वक्तव्य केलं होतं. आता त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील तोच कित्ता गिरवला आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं मन एकेल का की आपली जागा आपणच लढवणार अशी भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडे म्हणावा तसा ताकतीचा उमेदवार दिसत नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद झोकून ही जागा आपल्याकडे खेचून आणू शकतो असं सध्याच चित्र आहे.