खुलताबादचे नामांतर करा, संजय शिरसाटांची मागणी, जाणून घ्या नावाचा इतिहास काय?

खुलताबादचे नामांतर करा, संजय शिरसाटांची मागणी, जाणून घ्या नावाचा इतिहास काय?

Sanjay Shirsat On Khultabad Name :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. बजरंग दल, विश्वहिंदू परिषदेकडून कबर हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे तर आता पुन्हा एकदा औरंगजेबवरुन राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खुलताबादचे (Khultabad) नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

खुलताबादचं नाव रत्नापूर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र देखील लिहिले आहे. रत्नापूर हे नाव  इंग्रजांच्या काळापासून रेकॉर्डवर आहे. त्यामुळे दौलताबादचे नामांतर करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल. मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल असं संजय शिरसाट म्हणाले.

संभाजीनगरचं नाव खडकी होतो कालांतराने त्याच नाव औरंगाबाद झाला तसेच खुलताबादचं नाव पूर्वी रत्नापूर होतो कालांतराने त्याच नाव खुलताबाद झालं. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक शहरांची नाव बदलली होती. त्यावेळी धाराशिवचं नाव देखील बदलण्यात आले होते. मात्र आता आम्ही हे सर्व बाद – बाद आहे त्यांचे नाव बदलण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात नामांतरावरुन राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन कर्णधाराची घोषणा, BCCI ने बॅन केल्यानंतर हॅरी ब्रूककडे मोठी जबाबदारी 

खुलताबाद नावाचा इतिहास काय?

खुलताबादचे नाव पुर्वी रौझा होता. रौझा याता अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो. तसेत खुलताबादला संतांची भूमी किंवा शाश्वत निवासस्थान देखील म्हण्यात येत होते. तर खुलताबादचे आधीचे नाव खुलदाबाद असे देखील होते असं सांगण्यात येते. मात्र खुल्द मकान या औरंगजेबच्या मरणोत्तर उपाधीपासून खुलदाबाद असं नाव करण्यात आले आणि या खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube