मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा; सारथी योजनेतून परदेशी शिक्षणाच्या शुल्काची मर्यादा हटवली
Sarathi Foreign Scholarship नव्या निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची कमाल मर्यादा पूर्णपणे उठवण्यात आली आहे.
Sarathi Removes Foreign Scholarship Fee Cap for Maratha-Kunbi Students : महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (‘सारथी’) परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती (Sarathi Scholarship) योजनेच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची कमाल मर्यादा पूर्णपणे उठवण्यात आली आहे.
शेजारचे राज्य कर्नाटक पाडणार कृत्रिम पाऊस; आपले सरकार काय निर्णय घेणार ?
शैक्षणिक शुल्क आता थेट विद्यापीठाला
नवीन धोरणानुसार, परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे संपूर्ण शिक्षण शुल्क (Tuition Fees) आता राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत थेट संबंधित विद्यापीठाला अदा केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शुल्काचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
वार्षिक निर्वाह भत्ता मंजूर
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची खरेदी, पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध (Thesis) तयार करणे आणि स्थानिक प्रवासाच्या खर्चासाठी विशेष निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
यू.के. (UK) मधील विद्यार्थ्यांसाठी: दरवर्षी 1,100 पौंड
अमेरिका व इतर देशांतील विद्यार्थ्यांसाठी: दरवर्षी 1,500 अमेरिकन डॉलर
निवडीसाठी ‘क्यूएस रँकिंग’चा निकष
विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आता जागतिक स्तरावरील क्यूएस रँकिंग (QS Ranking) विचारात घेतले जाईल. जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाचे रँकिंग समान असेल, तर त्यांच्या मागील पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.
नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी
‘सारथी’ने यासंदर्भात राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते. नियोजन विभागाने पत्राद्वारे या सर्व सुधारणांना अधिकृत मान्यता दिली आहे. महायुती सरकारच्या या सकारात्मक पाऊलामुळे आर्थिक अडचणींमुळे परदेशी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे.
‘जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात आहेत. कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून आधीच स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘सारथी’ संस्थेच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत करण्यात आलेले सुधारित बदल हा मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.