Satara Politics : शंभूराज देसाई अडचणीत, भाजपनेच टाकला मोठा डाव

  • Written By: Published:
Satara Politics : शंभूराज देसाई अडचणीत, भाजपनेच टाकला मोठा डाव

एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या श्रेयवादाच्या नव्या अंकाला सुरूवात होणार आहे.

विष कालवत आहात, भान ठेवा; राहुल गांधींचे पाच मुद्दे फडणवीसांनी कसे खोडले ?

एकाच बाणात देसाई अन् पवारांची शिकार

एकीकडे महायुती सत्तेत असताना शंभुराज देसाईंच्या कट्टर विरोधक असलेल्या पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने (BJP Maharashtra) अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असतानाच दुसरीकडे भाजपनं एकाच बाणात दोन पक्षांची शिकार केली आहे. कारण पाटणकरांचा भाजप प्रवेश एकीकडे महायुतीत देसाईंसाठी अडचणीचा तर, दुसरीकडे शरद पवारांना मोठा धक्का देणारा मानला जात आहे.

सहन करण्याची मर्यादा आता संपलीय…भाजपसोबत चला

विरोधकांकडून होणारी अडवणूक, कार्यकर्त्यांची गळचेपी, पिळवणूक आणि दबावाचे राजकारण हा सर्व त्रास सहन करण्याची मर्यादा आता संपली आहे, त्यामुळे भाजपसोबत चला, असा आग्रह कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्याकडे धरला होता. या सर्व भावना पाटणकर यांनी 26 मे रोजी पार पडलेल्या मेळाव्यात ऐकून घेतल्या अन् आताची परिस्थिती, नवे विचारांची साथ असे संकेत देत भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.

अजितदादा-सुप्रिया सुळेंच्या एकत्र येण्यावर अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले आषाढीपर्यंत…

पाटणच्या जागेवरून पवारांमध्ये पडले अंतर

गेल्या 40 वर्षांपासून साताऱ्याच्या राजकारणात शरद पवारांना साथ देणाऱ्या पाटणकरांना नेहमी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या जात. त्यामुळे पवारांचे कट्टर समर्थक असतानाही पाटणकरांना फारसा फायदा झाला नसल्याची चर्चा आजही होते. कारण त्याहीवेळी शंभुराज देसाई मंत्री होते. मात्र, पाटणकर आणि शरद पवारांमध्ये अंतर पडण्यामागे 2024 मध्ये पार पडलेली निवडणूक कारणीभूत ठरली.

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत जेव्हा पाटणची जागा आघाडी धर्माचे कारण सांगून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यात आली. हा निर्णय पाटणकरांना मोठा धक्का देणारा होता. या एका कारणामुळे शरद पवार आणि पाटणकरांमध्ये अंतर पडण्यास सुरूवात झाली. यानंतर 2024 च्या विधानसभेत सत्यजित पाटणकरांनी देसाईंविरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

लाडक्या बहि‍णींमुळे महायुतीत वादाची ठिणगी? पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला

पक्षीय ताकद नसताही पाटणकरांची टफ फाईट

विधानसभा निवडणुकीत पक्षीय ताकद पाठीशी नसतानाही सत्यजीत पाटणकरांनी तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यापूर्वीच्या 2019 आणि 2014 च्या निवडणुकीतदेखील पाटणकरांनी 90 हजारांच्या आसपास मते मिळविली होती. 2024 च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पक्षाने बळ देण्याऐवजी साथ सोडल्याने पाटणकरांच्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चीड होती. तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी पाटणकरांवर भाजप प्रवेशासाठी दबाव वाढवल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा…, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार?

फडणवीसांचा हिरवा कंदील अन् देसाईंची अडचण

महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले शंभूराज देसाई हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून असल्याचे बोलले जाते. पण, ते पाटणकरांच्या भाजप प्रवेशाला आडवे येतील की काय अशी चर्चा होती. मात्र, पाटणच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांकडे पाटणकरांच्या प्रवेशाबाबत विषय काढला होता, त्यावेळी भाजप पक्ष म्हणून आणि संघटना मजबूत होत असेल तर, मैत्री, संबंध आडवे येणार नाहीत, असे फडणवीसांनी स्पष्ट करत पाटणकरांच्या भाजप प्रवेशबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. पण आता महायुती सत्तेत असतानाही भाजपनं टाकलेल्या डावामुळे शंभुराज देसाईच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात का होईन पण सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube