Satej Patil On Gokul : लक्षात ठेवा, गोकुळ तुमची जहागीर नाही… ; अध्यादेश लागू होताच सतेज पाटील आक्रमक
Satej Patil On Gokul : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. गोकुळसाठी झालेल्या निवडणुकीत
Satej Patil On Gokul : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. गोकुळसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. 13 जागा जिंकून त्यांच्याकडून सत्तेसाठी दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करत गोकुळमध्ये चार शासकीय संचालकांची नियुक्ती केली आहे. तर आता या सुधारणा अध्यादेशावर राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी सही केली आहे. ज्यामुळे या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर झाले आहे. अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होताच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले की, तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं ! आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दसरा चौकात कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची देखील माहिती सतेज पाटलांकडून देण्यात आली आहे. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणत कोल्हापूरकर येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असल्याने राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 6, 2026