‘शरद पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार’; म्हणाले, मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र…
Sharad Pawar on Raj Thackeray : माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत असा थेट आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आता पवारांनीही त्याला दिलं आहे. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही, असं शरद पवार म्हणाले.
हिंमत असेल तर फडणवीसांच्या विरोधात बोला; रोहित पवारांचं राज ठाकरेंना चॅलेंज
फक्त पवारच करतात का?
राज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालं नाही. मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो. त्यामुळे मला काही प्रयत्न करायची गरज नाही अन् मी करतही नाही. हातभार लावायचा प्रश्न नाही. मी आता बोललो हे हातभार लावायचं लक्षण आहे की सुधारवण्याचं लक्षण आहे, असे शरद पवार म्हणाले. मीही मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं. मला निवेदन दिलं. हे पवारच करतात का? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या नादी लागू नका. माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठलं तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपचा उबाठा अन् मनसेत भांडणं लावून वडेट्टीवारांचा हल्लाबोल
पवारांनी थांबवलं पाहिजे
मनोज जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती मणिपूर होईल, असं वक्तव्य करत आहेत. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवलं पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे. शरद पवारांचं राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणं हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केले.