Video : प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेश निश्चित; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय म्हणाले?

आज मुंबईत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत शशिकांत शिंदे यांना प्राजप्त तनपुरे यांच्याविषयी विचारण्यात आलं.

News Photo   2026 05 27T172814.440

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे.(NCP) यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून भविष्यातील फायदा आणि राजकारण लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तिकिटवाटप केले जात आहे. अहिल्यानगरातील नते प्राजक्त तनपुरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असून भाजपा त्यांना विधानपरिषदेसाठी संधी देणार आहे, बोलले जात आहे.

ते लवकरच शरद पवार यांच्या पक्षाला रामराम करणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्राजक्त तनपुरे लवकरच वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत शशिकांत शिंदे यांना प्राजप्त तनपुरे यांच्याविषयी विचारण्यात आले. तसेच पक्षातील काही लोक सत्तेत सामील होण्याच्या विचारात आहेत, याबाबत पक्षाची भूमिका काय आहे? असेही त्यांन विचारण्यात आले.

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित, मिळणार विधानपरिषदेची उमेदवारी; या दिवशी करणार पक्ष प्रवेश

यावर बोलताना विधानपरिषदेची निवडणूक असल्याने काही लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत, असे आम्हाला समजलेले आहे. परंतु त्या लोकांनी अद्याप पक्षाकडे कुठलेही राजीनामा पत्र किंवा कुठल्याही प्रकारचे मत व्यक्त केलेले नाही, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. मागच्या निवडणुकीच्या वेळी या लोकांच्या मागे काही चौकशा लावलेल्या होत्या. भाजपाने या लोकांच्या बाबतीत दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्या लोकांना काही आश्वासन देण्यात आले असेल. म्हणूनच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला असेल. परंतु माझ्याशी जेव्हा चर्चा होईल, तेव्हा मी त्यावर प्रत्यक्ष बोले, असेही ते प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत बोलताना म्हणाले. दरम्यान, आता प्राजक्त तनपुरे यांना भाजपा अहिल्यानगरात विधानपरिषदेचे तिकीट देण्याची शक्यता आहे. तशी तयारीही केली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us