Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसेंची हत्या जाणीवपूर्वक; राज्य सरकारची लेखी माहिती

Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसेंची हत्या जाणीवपूर्वक; राज्य सरकारची लेखी माहिती

Mumbai :  रत्नगिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या ही जाणूनबुजून करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने विधानपरिषदेत दिली आहे.  राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. यावरुन विरोधी पक्षाने देखील तितकीच जोरदार टीका केली होती.

या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे असे देखील सराकरने सांगितले आहे. या अधिवेशनात विरोधकांनी वारिसे यांच्या हत्येप्रकरणी लेखी प्रश्न विचारला होता. त्याला सरकारकडून देखील लेखी उत्तर आले आहे. याआधी प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने देखील ही हत्या पुर्वनियोजित असल्याचे म्हटले होते.

Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले

याआधी पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती.  कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून वारिसे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आहे म्हटल्यावर तो त्यांच्या जवळचा आहे का, त्याला कुठे वाचवता येईल का अशा शंकेला वाव राहतो. त्यामुळे या प्रकरणााचा निष्पक्षपणे तपास व्हावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube