Shinde-Fadnavis सरकारची जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी; माहिती अधिकारात उघड
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) अवघ्या सात महिन्यांत जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च केला आहे. माहिती अधिकारातून (Right to Information) ही आकडेवारी समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) यांनी फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या (State Government) तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. दिवसाला शिंदे यांनी १९ लाख ७४ हजार रुपयांचा खर्च केला आहे.
शिंदे यांनी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शासनाच्या तिजोरीतून ४२ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केल्याची धक्कादायक माहिती माहिती समोर आली आहे. नुकतेच राज्य शासनाकडून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
या धक्कादायक माहिती अशी की, या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशाची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? असा प्रश्न सामाजीक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे.
बारामती (Baramati) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी, राज्य सरकारकडे शिंदे सरकारने जाहीरातीवर किती खर्च केला, याची माहिती मागितली होती. यादव यांच्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिले आहे.