Live Blog । शिंदे विरुद्ध ठाकरे : आजची सुनावणी संपली, शिंदे गटाचा युक्तिवाद उद्या होणार
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती.
आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शिंदे-ठाकरे यांच्या ब्रेकअप मध्ये नक्की कोण विजयी होणार, याचा निकाल लागणार का ? यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
शिंदे गटाचा युक्तिवाद उद्या
सुप्रीम कोर्टात आज जवळपास ४ तास सुनावणी झाली. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज संपला असून उद्या शिंदे गटाचा युक्तिवाद होईल.
शिंदे गटाकडून हरीश साळवे उद्या बाजू मांडणार आहे.
-
सुप्रीम कोर्टात आजचा युक्तीवाद संपला
सुप्रीम कोर्टात आजचा युक्तीवाद संपला
उद्या शिंदे गटाकडून हरिश साळवे उद्या युक्तीवाद करणार
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणिदेवदत्त कामत यांचा युक्तिवाद
-
कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे
ठाकरे गटाचे वकील यांनी आज सकाळपासून अनेक मुद्दे मांडले. काही वेळापूर्वी त्यांचा युक्तिवाद संपला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे
- पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे अध्यक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार जातो
- अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षाला प्राधान्य देतात. अध्यक्षांनी कधीही पक्षपाती असू नये. अध्यक्षांविरोधात नोटीस दिल्यास ते काम करण्यास पात्र नसतात
- अनेक आमदारांच्या पक्षांतरामुळे नवीन सरकार स्थापन करावं लागलं आहे. राजकीय सभ्यता कायम राहण्यासाठी दहावी सूची दिली आहे. या दहाव्या सूचीचा गैरवापर होतोय की काय अशी शंका आहे.
- सध्या अनेक सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होत आहे. सदन सुरू असतानाच अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला जावा. सदन सुरू असताना नोटीस आणि पुढील सात दिवसात निवाडा व्हावा
- नबाम रेबिया प्रकरणाचं निकालपत्र वाचून दाखवण्याची परवानगी मागितली. आमदारांनी तेव्हा पक्षातल्या भ्रष्टाचाराचं पत्र दिलं होतं. अध्यक्षांऐवजी राज्यपालांनी तारखा बदलून अधिवेशन बोलावलं होतं रेबिया प्रकरणात राज्यपालांचा अध्यक्षांच्या अधिकारांवर प्रश्न, तरीही 21 जण अपात्र होत. नबाम रेबिया प्रकरणात उपाध्यक्षांचा निर्णय कोर्टानं रद्द केला.
-
अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरु
अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरु केला आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला आहे.
-
सदन सुरु असतानाचा अध्यक्षांवर अविश्वास ठरला मांडला जावा
आमदारांना अपात्र ठरवलं तर बहुमत नसणार आहे. तसेच, सदन सुरु असतानाचा अध्यक्षांवर अविश्वास ठरला मांडला जावा. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.
राजकीय सभ्यता राखण्यासाठी दहावी सूची म्हणजे पक्षांतरबंदीचा कायदा आणला गेला पण या सूचीचा गैरवापर होतो की काय अशी शंका आहे.
-
निकाल सत्याच्या बाजूने निकाल लागेल - खैरे
न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे, निकाल सत्याच्या बाजूने निकाल लागेल, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे
आमचे वकील भूमिका मांडत आहेत. जरी प्रकरण सु्प्रीम कोर्टात सुरु असले तरी आम्ही भूमिका मांडत आहोत. आमचं लक्ष तिकडे आहेच. आमची परमेश्वराला विनंती आहे, सत्याच्या बाजूने अर्थात उद्धजींच्या बाजूने निकाल लागावा.
-
अधिवेशन न भरवता अध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकता?
विधानसभा अध्यक्षांनी जेंव्हा 16 आमदारांना नोटीस बजावली होती तेंव्हा विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव नव्हता.
अधिवेशन न भरवता, तुम्ही अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकता?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
-
Nabam Rebiya : ठाकरेंची चिंता वाढवणारी काय आहे ‘नबाम रेबिया’ केस
Nabam Rebiya : ठाकरेंची चिंता वाढवणारी काय आहे ‘नबाम रेबिया’ केस
-
...तर, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत
पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत, सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
-
नबाम रेबिया प्रकरणात राज्यपालांची भूमिका तपासावी लागेल
चालू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आला.
त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी नबाम रेबिया प्रकरणात अरुणाचलच्या राज्यपालांची भूमिका तपासावी लागेल, असा प्रतियुक्तीवाद केली.
नबाम रेबिया प्रकरणाचे निकालपत्र पाहण्याची सिब्बल यांनी परवानगी मागितली आहे.