रायगडावर उसळली शिवभक्तांची भगवी लाट; संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन, म्हणाले….

रायगडावर उसळली शिवभक्तांची भगवी लाट; संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन, म्हणाले….

Coronation ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. शिवभक्तांची गर्दी झाल्यामुळं गडावर जाणार वाहतूक थांबली आहे. (Shiv devotees flock to Raigad for Chhatrapati Shivaji Maharaj’s 350 coronation ceremony)

रायगडावर आज ३५० वा राज्याभिषेक दिन साजरा होत असल्यानं राज्यभरातील शिवभक्तांनी रायगडावर अलोट गर्दी केली. शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषाना होत असून या घोषणांनी रायगडाचा परिसर दुमदुमला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगडला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले होते.

Wrestlers Protest : न्यायासाठी नोकरी अडथळा असेल तर… कुस्तीपटू बजरंग पुनियाने ठणकावून सांगितलं

सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड किल्ल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, किल्ले रायगडावर जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने महाड ते रायगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळं सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने राज्याभिषेकासाठी रायगडमध्ये दाखल झाले आहेत. या गर्दीमुळे गडावरील यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून  प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यंंत्रणेवरील आलेला ताण  टाळण्यासाठी प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर शिवभक्त मोठ्या संख्येने आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना आवाहन केले आहे. गडावर गेलेले शिवभक्त खाली येईपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. गडावर जाण्याची घाई करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. जोपर्यंत सर्वांना दर्शन होत नाही तोपर्यंत मी खाली जाणार नाही, गडावर कुठलाही अनूचित प्रकार घडता कामा नये, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube