पंढरपुरात हत्येचा थरार! शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगेंना गोळ्या झाडून संपवलं

Rajabhau Bhinge shot dead पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत.

Rajabhau Bhinge Shot Dead

Shiva Sanghatana president Rajabhau Bhinge shot dead in Pandharpur : पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भिंगे यांच्या इसबावी येथल त्यांच्या राहत्या घराजवळ ही घटना घडली आहे.

ब्रेकिंग: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 50 ते 60 दुकाने जळून खाक, 27 अग्निशमन गाड्या घटनास्थळी

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळी लागल्याने राजाभाऊ भिंगे गंभीर जखमी झाले होते. भिंगे यांना तातडीने पंढरपूरमधील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच समर्थक, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने अदानींचं काम रोखलं, अदानींच्या अधिकाऱ्यांची वनमंत्र्यांकडे धाव; तारळी प्रकल्पावरून नेमका वाद काय?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. या गोळीबारामागचे नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे का, यासह अन्य शक्यतांचाही पोलीस तपास करत आहेत.

follow us