ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असून या निमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह विरोधकांवर टीका केली आहे. या मेळाव्यात बोलताना आज कोणताही मनोरंजनचा कार्यक्रम नाही. आज विचार देण्याचे काम आहे कारण मनोरंजनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर निशाणा साधला.

तसेच शिंदेंनी बाळासाहेबांचा नाही अमित शाहांचा (Amit Shah) फोटो वापरावा कारण शिंदे सेनेचे प्रमुख अमित शाह आहे. ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं त्यांनीच पाठीत वार केला अशी टीका देखील या मेळव्यात बोलताना खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्यावर केली.

षण्मुखानंद सभागृहात आयोजित या मेळाव्यात बोलताना खासदार राऊत यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला पण 56 इंचाचं सरकार आतापर्यंत 4 अतिरेक्यांना पकडू शकले नाही. कुठे गेले 4 दहशतवादी? असा सवाल खासदार राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारला.  तसेच जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले होते की, आपल्यातील सर्व मतभेद विसरुन सरकार जी कारवाई करत आहे आपण त्यांच्यामागे ठामपणे उभं राहिला पाहिजे हीच आपली राष्ट्रभक्ती आहे.

हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे व देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत नाना पटोलेंचा गंभीर आरोप 

ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपने देशात राजकारण सुरु केलं. भाजपकडून आज ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली मत मागितली जात आहे. असा आरोप देखील राऊत यांनी या मेळाव्यात बोलताना भाजपवर केला. फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका फोनमुळे भारताने पाकिस्तावर होत असलेली कारवाई थांबवली मात्र भारताने असं का केले याचं उत्तर आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी भारताला दिले नाही. असं खासदार राऊत म्हणाले.  तर वाघ कधी गवत खात नाही, वाघ समजणारे शिंदे मोदींचं गवत खातात. सेना मराठी माणसांसाठी लढत होती तेव्हा बाकीचे पक्ष पाळण्यात होते असं देखील खासदार राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube