Naresh Mhaske : काही दिवसांत संजय राऊत स्वत:चे कपडे… शिवसेनेच्या प्रवक्त्यांनीही डिवचलं
काही दिवसांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत स्वत:चे कपडे काढून रस्त्यावर फिरणार असल्याचं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या रोज सकाळी सुरु असलेल्या पत्रकार परिषदेवरही त्यांनी जळजळीत टीका केली आहे.
‘कुणाची सुपारी घेऊन ‘बारसू’ला विरोध करता ?’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल !
नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊतांची रात्रीची नशा उतरलेली नसते म्हणूनच ते काहीही बोलत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच स्पष्ट केलंय. ‘सामना’ विकला जात नाही म्हणून ते रात्रभर उरलेल्या सामनाच्या पुड्या बांधत बसतात, त्याच रागातून ते सकाळी उठून पत्रकारांसमोर बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
उद्धव ठाकरेंची कोंडी करणारं हेच ते पत्र ! ठाकरेंनीच सांगितलं होतं तसं, मग आता..
तसेच मानसिकता बिघडल्यानेच ते दररोज सकाळी उठायचं अन् देशाचे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत आहेत. आता सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार तो निर्णय यांना काय माहित पडला आहे का? सर्वोच्च न्यायालयाने यांना सांगितला आहे काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राऊतांना चांगलंचं धारेवर धरलंय.
दरम्यान, भाजपच्या एकाही नेत्यांकडून संजय राऊत यांना सोडलं जात नसल्याची परिस्थिती सध्या सुरु असल्याचं दिसून येतंय. कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोण संजय राऊत? असा सवाल उपस्थित केला आहे.