खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही…

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा नांदेड शहरात अपघात झाल्याची घटना घडली असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Untitle (63)

MP Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde ) यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झालयाची घटना घडलीयं. नांदेड शहरातील साठे चौक परिसरात ही घटना घडली असून खासदार शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत.

अनुराग कश्यपच्या ‘बंदर’चा थरारक ट्रॅक ‘पिंजरा’ रिलीज; बॉबी देओल अंदाजाची जोरदार चर्चा

सकाळी नांदेडहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नायगावकडे निघाला होता. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नायगाव येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ते जात होते. शहरातून निघाल्यानंतर साठे चौक येथे ताफ्यातील एका वाहनासमोर अचानक एक व्यक्ती आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून वाहनांचे नुकसान झाले आहे.

follow us