रामदास कदमांना धक्का, संजय कदम ठाकरे गटात

रामदास कदमांना धक्का, संजय कदम ठाकरे गटात

मुंबई : माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम (Sanjay Kadam)यांनी आज मातोश्रीवर (Matoshree) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम (Ramdas Kadam)यांच्या होम ग्राउंडवर सभा घेणार आहेत. 5 मार्चला उद्धव ठाकरे रत्नागिरी (Ratnagiri)दौरा करणार आहेत, यादरम्यान सायंकाळी 5 वाजता ठाकरेंची खेडमधील गोळीबार मैदानात विराट जाहीर सभा होणारंय. त्याठिकाणी संजय कदम यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होणारंय.

राष्ट्रवादी नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळं कदम पिता-पुत्रांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून कदमांना बळ दिलं जाणारंय.

ठाकरे एकटेच नाहीत, इंदिरा गांधींसारखे बलाढ्य नेतेही चिन्हाचे युद्ध हरले !

दापोली मंडणगडचे माजी आमदार संजय कदम हे येत्या 5 मार्चला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवरच संजय कदम यांनी आज (दि.22) शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता संजय कदम यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश 5 मार्चला खेड येथील सभेत होणार आहे.

त्यामुळं कोकणात उद्धव ठाकरे यांचं बळ वाढणार असून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुन्हा एकदा दापोली मडंणगड मतदारसंघात चुरस निर्माण होणारंय. यावेळी मातोश्रीवर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

यावेळी संजय कदम यांच्यासोबत आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, कोणत्याही अटीवर हा मतदार संघ आपल्याकडं आला पाहिजे. येत्या 5 तारखेच्या सभेला मैदान अपुरं पडणार आहे. दुसऱ्या दिवशी शिमगा आहे. ही आपली पहिलीच सभा आहे. या सभेकडं सर्व देशाचं लक्ष असणारंय, त्यामुळं प्रत्येकानं जबाबदारी घ्या असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube