भंडारा उधळण प्रकरण ; ‘दिलगिरी व्यक्त करतो’, धनगर आंदोलकाला मारहाण प्रकरणी मागितली माफी

भंडारा उधळण प्रकरण ; ‘दिलगिरी व्यक्त करतो’, धनगर आंदोलकाला मारहाण प्रकरणी मागितली माफी

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केल्याची घटना आज सोलापुरात घडली. या प्रकारानंतर आंदोलकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर समस्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त केला असून मारहाण करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदाराला अटक होणार? रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द

धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केल्यानंतर त्यांना विखे पाटलांच्या सुरक्षा रक्षकांसह भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केली आहे. बंगाळे यांना मारहाण झाल्यानंतर धनगर समाजाकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. धनगर समाजाचे कार्यकर्ते अनिल बर्वे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करुन मारहाण केलेल्या नरेंद्र काळे यांच्यावर गुन्हा दाखल करुन राजीनाम्याची केली आहे.

Jailer Actor Passed Away : अभिनेते जी मारीमूथू यांचं निधन; डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा श्वास

अनिल बर्वे म्हणाले, नरेंद्र काळेंनी मारहाण केली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पालकमंत्र्यांनी असे गुंड प्रवृत्तीचे लोकं सोबत ठेऊ नका, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी नरेंद्र काळेंचा राजीनामा द्या, अशा लोकांना बेड्या ठोका नाहीतर धनगर समाज आक्रमक आंदोलनाचं हत्यार उपसणार आहे. जोपर्यंत भाजपचा शहराध्यक्ष माफी मागत नाही तोपर्यंत भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशाराही बर्वे यांनी यावेळी दिला आहे.

‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ

नरेंद्र काळेंचा माफीनामा :
माझ्याकडून अनावधानाने जी गोष्टी झाली, त्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी देखील धनगर समाजाचा कार्यकर्ता असून धनगर समाजाच्या चळवळीत काम करीत आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी विनंती आहे की, याचं भांडवल करु नये, झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या समाजाची दहा वेळा माफी मागण्यात मी किंतू परंतू करणार नाही, असं नरेंद्र काळे म्हणाले आहेत.

अटल बांबू समृद्धी योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!

नेमकं काय घडलं होतं?
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी धनगर समाजाकडून अनेकदा आंदोलनेही करण्यात आली आहे. आताही मराठा आंदोलनापाठोपाठ अहमदनगरमधील चौंडीमध्ये धनगर समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे, हे आंदोलन सुरु असतानाच सोलापूरचे धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे आज धनगर आरक्षणाच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे गेले होते.

https://www.youtube.com/watch?v=edyO3n2dG40

बंगाळे यांनी निवदेन दिले विखे पाटील निवेदन वाचत असतानाच बंगाळे यांनी खिशातून भंडाऱ्याची पुडी काढत विखे पाटलांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण केली. या प्रकारानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांसह भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडून बंगाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube