छ. संभाजीनगर दंगलीनंतर फडणवीसांचे खैरे अन् दानवेंकडे बोट, म्हणाले, नेत्यांनी…

  • Written By: Published:
Devendra Fadnavis

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. परंतु काही नेते जाणीवपूर्वक तिथली परिस्थिती अजून चिघळली पाहिजे म्हणून भडकवणारे राजकीय व्यक्तव्य करत आहेत. अशा स्थितीत नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंला लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जर कोणी चुकीचे स्टेटमेंट देत असेल तर ते कोणी देऊ नये सर्वानी शांतता पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्व नेत्यांची आहे. जर या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. यावेळी फडणवीसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

चंद्रकांत खैरे यांच्यावर बोलताना फडणवीस म्हणाले अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं म्हणजे किती राजकीय बुद्धीने बोललं जातंय, किती छोट्या बुद्धीने बोललं जातंय हे त्याच एक उदाहरण आहे.

IPL 2023 : IPLच्या दिमाखदार सोहळ्यात दिसणार दिग्गज अभिनेत्रींचा जलवा 

काही नेते जाणीव पूर्वक राजकीय स्टेटमेंट देऊन तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत. स्वतःचा स्वार्थासाठी हा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. परंतु त्यांनी हे तात्काळ थांबावं असे माझी त्यांना विनंती आहे.

Tags

follow us