…पण माझा सहकाही आज आपल्यात नाही, धनंजय मुंडेंना प्रचारसभेत कराडची आठवण

धनंजय मुंडे यांची परळीमधील सगळी कामं वाल्मिक कराड हाच पाहायचा. येथील जगमित्र कार्यालयात तो हे कामकाज पाहत होता.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 24T173040.821

माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळीत (Election) नगर परिषदेच्या प्रचार सभेत बोलताना, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली. माझा सहकारी आज आपल्यात नाही याची जाणीव असल्याचं ते यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. तसंच न्यायालय काय खरं काय खोटे हे तपासून पाहील, असंही ते म्हणालेत.

धनंजय मुंडे यांची परळीमधील सगळी कामं वाल्मिक कराड हाच पाहायचा. येथील जगमित्र कार्यालयात तो हे कामकाज पाहत होता. आर्थिक नियोजनापासून अगदी निवडणूक प्रचार यंत्रणेची जबाबदारीही वाल्मिक कराडवरच होती. या करावडर आता सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचे आरोप आरोप आहे. झाल्यानंतर त्याला जेलमध्ये जावे लागलं. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही गेलं. अनेकदा मंत्रिपद गेल्याची खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी तीन शब्दांत दिलं उत्तर

आज तर परळी नगरपालिकेच्या प्रचारावेळी वाल्मिक कराडची आठवण काढून अण्णा समर्थकांना त्यांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय १२ महिने २४ तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाहीये. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड याची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सहकाऱ्यासाठी खुलेपणाने बाजू मांडली नाही, असं प्रत्यपक्षणे सांगत कराड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय कटाच्या उद्देशातून त्यांना अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप कराड कुटुंबियांनी केला. त्यामुळेच मुंडे यांनी कराडची आठवण केल्याचंही बोललं जातय.

follow us