दादांच्या जाण्याचं राजकारण नको; रोहित पवार, सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांनी फटकारलं
अजित पवार यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख त्यांच्या कुटुंबियांना, अपघाताचं राजकारण कोणीही करू नये, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली.
Sunetra Pawar gets emotional : अजित पवार यांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणावर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यत्क्त केली आहे. अजित पवार यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख त्यांच्या कुटुंबियांना आहे, त्यामुळे या अपघाताचं राजकारण कोणीही करू नये, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली. यावेळी त्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील थेट टीका केली. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांवर आपलं पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित दादांच्या जाण्याचं दुःख किती आहे हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कोणाला जास्त माहिती असणार, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सातत्याने होणाऱ्या चर्चा आणि उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित दादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, असं आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केलं. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी तपास यंत्रणांना त्यांचं काम करण्यासाठी आवश्यक वेळ देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
तपासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे यात. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी वेगवेगळे निष्कर्ष काढणं योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. अजित पवार यांच्या निधनामुळे कुटुंबावर झालेल्या आघाताचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. दादांची आई, दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा जास्त दुःख कोणाला कळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर, दादांच्या जाण्याचं राजकारण कोणीच करू नये असं मला वाटतं, असाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
सरकारी शाळांमध्ये पत्रकार, युट्युबर्सच्या प्रवेशावरील निर्बंध कायम; याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
या प्रकरणाची सातत्याने माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा आणि वेगवेगळ्या दाव्यावर देखील सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का असे मला वाटते, असं त्या म्हणाल्या. तपासाशी संबंधित प्रत्येक बाब तात्काळ माध्यमांमध्ये समोर येईलच असं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. सतत मीडिया मध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी तपास प्रक्रियेला वेळ देण्याची भूमिका पुन्हा मांडली. तपास यंत्रणांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि या संवेदनशील प्रकरणावरून राजकारण करणं टाळलं पाहिजे, असा सूर त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रियेतून दिसून आला.
अजित पवार यांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबाच्या दुःखाचा विचार करून अजित पवार यांच्या जाण्याचं राजकारण करू नये आणि तपास यंत्रणांना त्यांचं काम करण्यासाठी वेळ द्यावा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.