Supriya Sule : जलसंपदा विभागाच्या परीक्षेत 1 हजाराने उमेदवारांची संख्या वाढवावी

Supriya Sule :   जलसंपदा विभागाच्या परीक्षेत 1 हजाराने उमेदवारांची संख्या वाढवावी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP )  नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule )  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )   व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )  यांच्याकडे ट्विट करत एक विनंती केली आहे. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संख्या 1 हजारांपर्यंत वाढवावी, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा देखील संपलेली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत उमेदवारांची संख्या वाढवल्यास विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

सुळे ट्विट मध्ये म्हणाल्या की, जलसंपदा विभागामध्ये २०१९ साली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा देखील झाल्या असून एक-दोन दिवसांत निकाल अपेक्षित आहे.परंतु जलसंपदा विभागामध्ये रिक्त असणाऱ्या जागांच्या तुलनेत भरती निघालेल्या जागांची संख्या अतिशय कमी आहे. कोरोना व इतर काही कारणांमुळे गेली काही वर्षे जलसंपदा विभागामध्ये भरती होऊ शकलेली नाही. तसेच अनेक उमेदवार आता या परीक्षेनंतर वयाच्या अटींची पूर्तता करु शकणार नाहीत, असे त्यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की कृपया जलसंपदा विभागातील या परीक्षेनंतर भरावयाच्या कनिष्ठ अभियंता या पदाची संख्या एक हजारांहून अधिक पर्यंत वाढवावी. याचा थेट फायदा या मुलांना मिळू शकेल, अशी विनंती ट्विटद्वारे त्यांनी शिंदे व फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube