धक्कादायक! वडिलांची आत्महत्या अन् दोन दिवसांनी सापडला मुलाचा कुजलेला मृतदेह; खान्देशी रील स्टारसोबत काय घडलं?

  • Written By: Published:
धक्कादायक! वडिलांची आत्महत्या अन् दोन दिवसांनी सापडला मुलाचा कुजलेला मृतदेह; खान्देशी रील स्टारसोबत काय घडलं?

Reel star dies in Khandesh : खानदेशचा रीलस्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Khandesh ) एका जागी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आल्याने एरंडोल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विक्कीने वडिलांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय २२ रा. भोरखेडा तालुका धरणगाव हल्ली मुक्काम एरंडोल) असं मयत झालेल्या रील स्टार तरुणाचे नाव आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता 

विकी पाटील हा तरुण एरंडोल शहरात राहत होता. त्याचे आईवडील देखील एरंडोल शहरातच राहत होते. त्याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. त्यांचा मुलगा विकी पाटील हा कुणाला काहीही न सांगता गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. तर दुसरीकडे मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःचे जीवन संपविले होते. या दोन्ही घटनेचा ताळमेळ जुडवून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती.

सावधान! आताच ही  सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र

अशातच गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विकी पाटील यांचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ पुरल्याची धक्कादायक माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले आणि पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

एकीकडे त्याच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून या घटनेची माहिती दिली होती तर दुसरीकडे सुसाईड नोट प्रमाणे त्यांच्या मुलाचा मृतदेह देखील आढळून आला आहे. या घटनेमागील कारण किंवा मारेकरी यांच्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

खानदेशच्या रील स्टार म्हणून ओळख

विकी हा गेल्या अनेक वर्षांपासून युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती रील टाकून प्रेक्षकांना त्याच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचप्रमाणे युट्युबवर त्याने अनेक अहिराणी गाण्यांमध्ये काम देखील केले आहे. त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स देखील आहेत. त्याच्या लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी दोघेजण व्हिडिओ आणि रील बनवायचे. खान्देशचा रील स्टार म्हणून त्याची ओळख होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या