..अखेर तरुणाने संपवलं जीवन; मित्रानेच मित्राचा केला घात; कॅफे उघडण्यासाठी घेतले होते ‘इतके’ पैसे

..अखेर तरुणाने संपवलं जीवन; मित्रानेच मित्राचा केला घात; कॅफे उघडण्यासाठी घेतले होते ‘इतके’ पैसे

financial fraud in Nagpur : कॅफे उघडण्यासाठी ११ लाख ७० हजार रुपये दिल्यावर मित्राने घात केल्याने तरुणाने २१ ऑगस्ट ला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (fraud) याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तुषार सुधीर येवले (वय २४, रा. म्हाळगीनगर), असं मृत तरुणाचं नाव आहे.

मन सुन्न करणारी घटना! लेकीच्या घरीच वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

आश्वासन दिलं पण पैसे नाही

सुधीर येवले हे वीज विभागात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कामठी येथील भूखंडाची विक्री केली होती. यातून लाखो रुपये मिळाले होते. ही बाब त्यांचा मुलगा तुषार याच्या बालमित्र गोपी (बदललेले नाव) याला माहिती होती. गोपीचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. दरम्यान, त्याला कॅफे उघडण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. तुषारच्या वडिलांनी नुकताच भूखंड विकला असून त्याचे त्यांना लाखो रुपये मिळाल्याची बाब गोपीला माहिती होती. त्याने तुषारकडे पैशांची मदत मागितली. लवकरच पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं. सुरक्षा म्हणून कोरा धनादेशही दिला.

फोन उचलले नाहीत

गोपी हा बालपणापासूनचा मित्र असल्याने तुषारने वडिलांना गळ घालून मित्राच्या खात्यात ११ लाख ७० हजार रुपये वळते केले. मित्राने सुरक्षा म्हणून त्याला धनादेश दिला होता. काही दिवसातच कॅफे बंद झाला आणि गोपी मुंबईला गेला. या दरम्यान, तुषारने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने कॅफे विकून पैसे परत करण्याचं सांगितलं. मात्र, बरेच दिवस होऊनही त्याने पैसे परत केले नाही. या दरम्यान तुषारने जेव्हाही त्याला फोन केले तो टाळाटाळ करीत होता. नंतर त्याने तुषारचे फोन उचलणंही बंद केलं. गोपीने दिलेला धनादेश वठविण्यासाठी बँकेत टाकला असता तोही बाऊंस झाला. यामुळे तुषार तणावात गेला.

ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २२० मिलिमीटरची नोंद; कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

चोरीचा आरोप

या तणावातून २१ ऑगस्ट रोजी तुषारने विष प्राशन केलं. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विष प्राशन करण्यापूर्वी तुषारने सुसाईड नोट लिहिली. त्यात त्याने मित्राकडून त्याच्या आई- वडिलांना पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी तुषार याच्यावरच कॅफेतील पैसे चोरी करण्याचा आरोप लावला आहे. ज्याच्या पैशांनी कॅफे सुरू झाला तो कॅफेतून पैसे चोरी करीत असल्याची बाब समजण्यापलिकडे आहे. दरम्यान, तुषारच्या आई-वडिलांनी गुन्हा नोंदवून न्याय देण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube