ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २२० मिलिमीटरची नोंद; कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २२० मिलिमीटरची नोंद; कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशात तीन दिवसांपासून सुरू झालेला पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळत आहे. (Rain ) ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २२० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांत वेगाने पाण्याची आवक सुरू असून राज्यातील तब्बल ५३ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

वेस्टर्न लाईनवर तब्बल 35 दिवसांचा मेगा ब्लॉक; गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांचा खोळंबा होणार?

कोकणात जोरदार पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर धुळे, जळगावमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. विदर्भ, मराठवाड्यात आठवडाभर अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारपासून जोर कमी झाला आहे.

भाजप तयार! जम्मू काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींच्या हाती कमान

पाऊस दृष्टिक्षेपात

नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस.

नगर, सोलापूरला तुरळक सरी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube