भाजप तयार! जम्मू काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींच्या हाती कमान
Jammu Kashmir Elections : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) मतदानासाठी आता काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. अशातच भाजप, काँग्रेस, नॅशनल काँफ्रन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टिने निवडणूक काळातील घोषणा सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकांसाठी (BJP) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. या यादीत एकूण 40 स्टार प्रचारक आहेत.
याआधी भाजपने 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र काही तासांच्या आतच ही यादी माघारी घेण्याची नामु्ष्की पक्षावर ओढवली. याबरोबरच भाजपने स्पष्ट केले आहे की या निवडणुकीत कोणत्याच पक्षाबरोबर युती वा आघाडी करणार नाही. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 24 मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, जी. किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान, जितेंद्र सिंह यांच्यासह 40 प्रचारकांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, जम्मू काश्मीरचे निवडणूक प्रभारी राम माधव, तरुण चुघ, आशीष सूद, माजी मंत्री स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, वी. के. सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. जम्मू काश्मीर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह, कवींद्र गुप्ता, सुनील शर्मा, देविंदर सिंह राणा यांच्यासह स्थानिक नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
जम्मू काश्मिरात तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी तयार! स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नावांचा समावेश
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स जागावाटप ठरलं
जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.