पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; टेक ऑफ आधीच निष्पन्न झाल्याने अनर्थ टळला

Pankaja Munde यांच्या छत्रपती संभाजीनगरवरून निघताना हेलिकॉप्टरध्ये बिघाड झाला. मात्र टेक ऑफ अगोदरच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Pankaja Munde

Technical failure in Pankaja Munde’s helicopter Disaster averted as take-off was already completed : राज्यामध्ये एकीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे राज्यामध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असताना भाजप नेत्या पंकजा मुंडेंबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून निघताना त्यांच्या हेलिकॉप्टरध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मात्र टेक ऑफ घेण्याअगोदरच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द

राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी पंकजा मुंडे या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. त्यासाठी त्या निघणार असतानाच त्यांच्या हेलिकॉप्टरध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मात्र टेक ऑफ घेण्याअगोदरच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे आता मुंडेंनी त्यांच्या सभा आणि प्रवास पुढे ढकलला आहे.

follow us