पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

  • Written By: Last Updated:
पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता.

तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना म्हटले की, ‘या नगरसेवकाच्या फ्लॅटचे भाडे देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यावेळी त्याना माझ्याकडे घाणेरडी मागणी केली. मात्र यावेळी मी त्याच्या टेबलवर असलेला पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या चेहऱ्यावर फेकला. त्याला खडसावले की, असंच मोठ व्हायचं असतं तर मी भाड्याच्या घरात राहिले नसते. करिअरच्या सुरूवातीलाच माझ घर झालं असतं.’

एका सिनेपत्रकाराच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली ती पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती.

तेजस्विनीने 2004 साली केदार शिंदेंच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने ‘मी सिंधुताई सपकाळ’,’तू ही रे’, ‘देवा’, ‘एक तारा’ अशा गाजलेल्या सिनेमांत काम केलं.’एकाच या जन्मी जनू’, ‘लज्जा’ या मालिकांमध्येदेखील तिने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची ‘रानबाजार’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच ती ‘अथांग’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिची ‘बांबू’ या सिनेमाची ती निर्मिती करणार आहे. तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube