live now
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी; आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद Live
आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील देवदत्त कामत न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. सुमारे 30 ते 35 मिनिटे ते आपली बाजू मांडतील
Thackeray faction’s final arguments : शिवसेना पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबाबत सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गेल्या पाच सुनावण्यांदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आपली बाजू सविस्तरपणे मांडली. शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष असून त्याची ओळख, संघटनात्मक रचना आणि पक्षाचे अस्तित्व केवळ विधिमंडळातील संख्याबळावर ठरवता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काल झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही गटाला या चिन्हाचा वापर करू देऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. या मागणीमुळे सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील देवदत्त कामत न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. सुमारे 30 ते 35 मिनिटे ते आपली बाजू मांडतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर न्यायालय या प्रकरणातील पुढील सुनावणी किंवा निर्णयाबाबत दिशा देऊ शकते.
LIVE NEWS & UPDATES
-
आजची कोर्टातील सुनावणी संपली..
कोर्टात ठाकरेंकडून सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद आज संपला....
-
विधीमंडळात पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही- कामत
विधीमंडळात पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही, असे मोठे विधान कामत यांनी कोर्टात केले.
-
कामत यांनी कोर्टाचं वेधलं अनेक मुद्द्यांकडे लक्ष
राजकीय पक्ष फुटला की तरच चिन्हाचा मुद्दा येतो - कामत
फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत - कामत
आयोग न्यायाधिकरणासारखे आहे, सर्वोच्च न्याय देणारे नाही - कामत
कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा
पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं - कामत
राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का? - कोर्टपक्षातून वेगळं व्हायचं असले वेगळा पक्ष काढा - कामत
-
सुप्रीम कोर्टाने केलेल्या विधानाने शिंदे गटाला मोठा धक्का
आमदारांना अपात्र करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे मोठे विधान सुप्रीम कोर्टाने केले. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे.
-
कामत यांचा कोर्टात थेट सवाल
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांना देऊन टाकणार का? कामत यांचा कोर्टात थेट सवाल
-
आमच्याकडे अधिकार आहेत, यात काही शंका नाही- कोर्ट
आमच्याकडे अधिकार आहेत, यात काही शंका नाही, असे मोठे विधान कामत यांच्या युक्तीवादादरम्यान कोर्टाने केले
-
फूट पडलेली आहे की, नाही याचा सोक्षमोक्ष लावा- कामत
फूट पडलेली आहे की, नाही याचा सोक्षमोक्ष लावा, असे कोर्टात कामत यांनी म्हटले.
-
आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला - कामत
आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला - कामत
ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांनी आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला असून पक्षांतराचा फायदा मिळू नये म्हणून आमदारांना अपात्र करायला हवं होतं असं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे.
-
काल न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर युक्तिवाद
काल न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर युक्तिवाद करणार असं न्यायालयात ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे. पक्षांतराचा फायदा मिळू नये म्हणून आमदारांना अपात्र करायला हवं होतं असं देवदत्त कामत यांनी काल विचारलेल्या प्रश्वावर उत्तर दिलं आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहे.
-
धनुष्यबाण चिन्हावर निकाल आमच्याच बाजूने लागेल; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
मंत्री उदय सामंत हे भंडारा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याने भंडारा जिल्ह्या उद्योगांना गती मिळेल, असा दावा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भांडेकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना पक्ष सुनावणीवरही भाष्य केलं आहे. धनुष्यबाण चिन्हावर निकाल आमच्याच बाजूने लागेल, असं विधान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे.