Live Blog । Thackeray Vs Shinde : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बलांनी काय युक्तिवाद केला?

  • Written By: Published:
Uddhav Thackeray & Eknath Shinde & supreme court

आजपासून सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. कोर्टामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाकडून नव्याने सुनावणी केली जाणार आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कोर्टाच्या कामकाजाचे आणि प्रत्येक अपडेट वाचा

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Feb 2023 04:22 PM (IST)

    आजची सुनावणी संपली

    सुप्रिम कोर्टाची आजची सुनावणी संपली आहे.

    उद्या पुन्हा नियमित सुनावणी होणार

  • 21 Feb 2023 03:53 PM (IST)

    निवडणूक आयोगाने पक्षाला गृहीत धरलं नाही

    निवडणूक आयोगाने फक्त विधीमंडळातील बहुमतावर निर्णय दिला. निवडणूक आयोगाने पक्षाला गृहीत धरलं नाही. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    पक्षाचं काही म्हणणं न मांडू देता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. निवडणूक आयोगाने हे करण्यापूर्वी सुनावणी करण्याची गरज होती. उद्धव ठाकरेंनी या आदेशाला आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोगाने सुचवलेलं नाव आणि चिन्ह दोन्हीही नाकारल्या

  • 21 Feb 2023 03:49 PM (IST)

    शिंदे गटाकडे संपूर्ण बहुमत आहे असं नाही.

    शिंदे गट सगळीकडे आमच्याकडे बहुमत असलेलं सांगत असले तरी शिंदे गटाकडे जबरदस्त बहुमत आहे, असं नाही. सिब्बल यांचा युक्तिवाद

    राज्यसभेचे ३ आणि लोकसभेचे ६ खासदार ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे दोन सभागृहात (लोकसभा, विधानसभा) त्यांचे बहुमत असेल तर दोन सभागृहांत (राज्यसभा, विधानपरिषद) आमचे बहुमत आहे.

  • 21 Feb 2023 03:22 PM (IST)

    १२ आमदारांचा प्रश्न लांबवून ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण…

    आमदारांनी बंड करणं हे सभागृहाच्या बाहेर घडलेली घटना आहे. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष नव्हे तर पक्ष अध्यक्ष पक्षशिस्त भंगाची कारवाई करू शकतात, असा युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला. तसेच  राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही. राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवण्याचे आदेश कसे काय दिले? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

    Kapil Sibal : १२ आमदारांचा प्रश्न लांबवून ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण…

  • 21 Feb 2023 03:15 PM (IST)

    ‘व्हिप’मुळे ठाकरेंची आमदारकी जाणार? व्हिप म्हणजे काय, कोणाला अधिकार?

    मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचं काय होणार ? त्यांच विधानसभा आणि लोकसभा सदस्यत्व जाणार का असे प्रश्न माध्यमांत चर्चेला जात आहे.

    त्यावर शिंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या आमदाराचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही हा व्हीप लागू होत नाही. असा दावा केला.

    या पार्श्वभूमीवर व्हीप म्हणजे काय? ज्यामुळे ठाकरे गटातील आमदारांच सदस्यत्व टिकणार का नाही, याचं भविष्य ठरवणार आहे.

    Thackeray Vs Shinde : ‘व्हिप’मुळे ठाकरेंची आमदारकी जाणार? व्हिप म्हणजे काय, कोणाला अधिकार?

  • 21 Feb 2023 02:54 PM (IST)

    भरत गोगावले 'प्रतोद' कधी झाले?

    शिंदे गटाकडून भरत गोगावले 'प्रतोद' म्हणून यांची नेमणूक केली पण त्यांना मान्यता नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मिळाली.

    त्यामुळे त्यांचा व्हिप कसा मानायचा ?

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 21 Feb 2023 02:03 PM (IST)

    ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुनावणी सुरू

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे.

    लंच ब्रेकसाठी काही वेळ कामकाज स्थगितीनंतर थोड्याच वेळात सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल.

  • 21 Feb 2023 02:00 PM (IST)

    अध्यक्षांची निवड चुकीची

    विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकर यांना (शिंदे गट वगळल्यास) बहुमतापेक्षा एक मत कमी आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    शिंदे गटाला वगळल्यानंतर नार्वेकरांना निवडीसाठी आवश्यक ती मतं मिळाली. नीरज कौल यांचा प्रतिवाद

  • 21 Feb 2023 12:32 PM (IST)

    राज्याच्या बाहेर झालेल्या बैठका अधिकृत नाही

    राज्याच्या बाहेर (आसाम मध्ये झालेल्या) झालेल्या सर्व बैठका पक्षाच्या नाहीत.

    त्यामुळे त्या अधिकृत नाहीत, त्यामुळे शिंदेचे अधिकृत नाही

    सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 21 Feb 2023 12:18 PM (IST)

    विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदेंच्या शिवसेनेकडे

    विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले आहे. लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून आज अधिकृत पत्र जारी करत शिंदेच्या शिवसेनेला हे कार्यालय देण्याचा निर्णय दिला आहे.

  • 21 Feb 2023 12:01 PM (IST)

    आजच युक्तिवाद संपवा, सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सांगितलं

    मुद्देसूद युक्तिवाद करा आणि आजच युक्तिवाद संपवा, सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सांगितलं

    ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांना उद्या सकाळी पहिल्या सत्रात युक्तिवाद करण्यास सांगितलं आहे

    त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवादासाठी वेळ दिला जाणार

    संघर्षाबाबतची सुनावणी लवकर संपवण्याचे कोर्टाकडून संकेत

  • 21 Feb 2023 11:47 AM (IST)

    राज्यपालांचे अधिकार काय ?

    संविधानाच रक्षण करणं ही राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत आहेत.

    राज्यपालांनी सकाळीच शपथविधी घेतला आणि संविधानिक जबाबदारीच उल्लंघन केलं आहे.

    राज्यपालांच्या अधिकारांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत का ?

    १२ आमदारांचा प्रश्न लांबवून ठेवणं हे राज्यपालांचं राजकारण

  • 21 Feb 2023 11:42 AM (IST)

    गटनेता ठरवण्याचे अधिकार कुणाला ?

    गटनेता ठरवण्याचे अधिकार कुणाला आमदारांना की पक्षाला?

    सभागृहाबाहेर बसून काही आमदार पक्षाचा व्हीप बदलू शकतात का ?

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 21 Feb 2023 11:40 AM (IST)

    राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही

    राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही.

    राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवण्याचे आदेश कसे काय दिले? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 21 Feb 2023 11:38 AM (IST)

    आमदारांच बंड हे सभागृहाबाहेरील घटना

    आमदारांनी बंड करणं हे सभागृहाच्या बाहेर घटना घडली आहे. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष नव्हे तर पक्ष अध्यक्ष पक्षशिस्त भंगाची कारवाई करू शकतात.

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 21 Feb 2023 11:36 AM (IST)

    कोणते वकील मांडणार बाजू ?

    सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.

    सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार

    शिंदे गटाकडून हरिश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंग युक्तिवाद करणार

  • 21 Feb 2023 11:29 AM (IST)

    सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

    सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

    ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत

  • 21 Feb 2023 11:27 AM (IST)

    शिंदे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेऊ नये, यासाठी शिंदे गटाकडून रिट पिटिशन दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी मान्य करत उद्या सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे.

  • 21 Feb 2023 11:19 AM (IST)

    निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी

    निवडणूक आयोगाच्या विरोधातील उद्धव ठाकरे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने मेन्शन करून घेतले आहे.

    ठाकरेंच्या नव्या याचिकेवर कोर्ट उद्या ३.३० वाजता या याचिकेवर सुनावणी करणार

  • 21 Feb 2023 10:54 AM (IST)

    संजय राऊत म्हणतात, "मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की..."

    आजच्या सुप्रीम कोर्टाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. राऊत यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य शेअर केलं आहे.

Tags

follow us