मोठी बातमी! राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने 24 तास उघडी ठेवता येणार

दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांसाठी मोठी बातमी आहे. २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे.

Hotel

राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. (Government) मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. परंतू, आता संपूर्ण महाराष्ट्रातच २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची मंजूरी देण्यात आली आहे.

मुंबईत शरद पवार-अजित पवारांची बैठक, एक तास चर्चा; राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू

राज्यात आता नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू ठेवण्याची सूट राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २ (२) मध्ये “दिवस” याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरु होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल अशी तरतूद केली आहे.

follow us

संबंधित बातम्या