छ. संभाजीनगरात मध्यरात्री एन्काऊंटरचा थरार, मंत्री शिरसाटांची शंका खरी ठरली का?, पाहा A टू Z स्टोरी

छ. संभाजीनगरात मध्यरात्री एन्काऊंटरचा थरार, मंत्री शिरसाटांची शंका खरी ठरली का?, पाहा A टू Z स्टोरी

Encounter in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये २७/५ च्या मध्यरात्री एक थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. (Encounter) आरोपी तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचं समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहचला होता. पोलीस आल्याचं कळताच आरोपीने गोळीबार केला. तसंच, त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला. अखेर, संतापलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि अमोल खोतकर नावाच्या आरोपीचा एन्काऊंटर झाला.

घटना काय?

तर झालं असं की, छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. ७ मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. १५ मे रोजी रात्री २ ते ४ या दरम्यान ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी असा ६ कोटींचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यामुळे संभाजीनगरसह राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती.

बीड जिल्ह्यासाठी अपघाती सत्र! मुंडे, मेटे आणि आता आर. टी देशमुख संशयाचं मळभ मात्र कायम

ही घटना घडल्यावर वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी ९ पोलीस पथकं घटनेचा तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी काल सोमवार रात्री पोलिसांचं पथक रवाना झालं होतं. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केल्याने त्याचा एन्काऊंटर झाला.

पाच अटक

हा सगळा प्रकार घडला असला तरी यातील ५ आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचं समोर येत होतं. चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करणं पोलिसांसाठी महत्वाचं असतानाच त्याचा एनकाऊंटर झाला आहे. त्यामुळे काही शंका कुशंकाही उपस्थित होत आहेत. कारण, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube