रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे ( Roshni Shinde) यांना गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जबर मारहाण झाली होती. या घटनेचे राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्या मारेकऱ्यांवर कुठलीही कारवाई न केल्यानं काल ठाण्यात ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission देखील पोलीस आयुक्तांना या घटनेच्या कार्यवाहिचा अहवाल मागितला होता. दरम्यान, आता पोलिसांनी आपला अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर केला. मात्र, महिला आयोग हा पोलिसांनी केलेल्या कारवाईविषयी असमाधानी आहे.

राज्य महिला आयोगाने याबाबत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलं. त्या पत्रात लिहिलं आहे की, रोशनी शिंद यांना जमावाने केलेल्या मारहाणीबाबत महिला आयोगाने दखल घेऊन आपल्याला कार्यवाहीचा अहवाला सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. त्या अहवालाचे अवलोकन केले असता पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवून न्यायालयाच्या परवानगीने तपास सुरू आहे. मात्र, रोशनी शिंदे यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल स्वत: कासारवडवली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज सादर केला होता. तसेच त्यांच्या कार्यालयात घुसलेल्या जमावातील लोक व तेथे झालेला वाद माध्यमांनी प्रसारीत केलेल्या चित्रफितींमध्ये दिसत आहे. त्यामुळं या प्रकरणी झालेल्या कावाईबाबत आयोग असमाधानी आहे, असं सांगितलं आहे.

दरम्यान, आता राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना 11 एप्रिल पर्यंत पुन्हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोमवारी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानं ही मारहाण झाली आहे, असं सांगितलं जात आहे. रोशनी ह्या गर्भवती असतांना त्यांच्या पोटात लाथा मारल्या गेल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांचा गुन्हा नोंद न करता उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे.

Atiq Ahmed News : अतिक अहमदचा मुलाने केला फायर, व्हिडिओ व्हायरल

अशातच या प्रकरणात राज्य महिला आयोगानेही उडी घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने या शिंदे मारहाण प्रकरणाचा अहवाल ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाकडे आपल्या कार्यावाहीचा अहवाल सादर केला. अहवाल सादर केल्यानंतर महिला आयोग नेमकी काय भूमिका घेते, याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, आयोगाने पोलिसांच्या कारवाई अहवाला विषयी नाराजी व्यक्त केली. या अहवालात सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसत नाही, असं आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळं पोलीस आयुक्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube